बहुमत नसताना भाजपने खेचून आणले सभापतीपद

Foto
छत्रपती संभाजीनगर : उबाठाचे तीन सदस्य गैरहजर, उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेचे सदस्य आमने सामने

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) पंचायत समितीच्या निवडणुकीत बहुमत नसतानाही भाजपने सभपतीपद खेचून आणले आहे. सभापतपदी कल्याण केशराव गायकवाड यांची तर उपसभापतीपदी शिंदे सेनेचे बाळासाहेब वाल्मीक - गाडे यांची निवड करण्यात आली आहे, उबाठाचे तीन सदस्य - गैरहजर राहिल्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती, - उपसभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी १० मार्च दुपारी - २ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यकंट राठोड तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून -तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांची उपस्थिती होती.

सभापती, उपसभापतींची निवड असल्याने पंचायत - समितीमध्ये आणि बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बैठकीला दुपारी २ वाजता सुरुवात झाली. यावेळी सभागृहात १७ उमेदवार उपस्थित होते. सभापतीपदासाठी भाजपचे कल्याण गायकवाड, सर्जेराव चव्हाण आणि राष्ट्रादी - काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अनुराग शिंदे या तिघांनी अर्ज दखल केले. तर उपसभापती पदासाठी शिंदेसेनेचे बाळासाहेब गाडे, शिंदेसेनेचेच बाळासाहेब राठोड आणि राष्ट्रादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अनुराग शिंदे या तिघांनी अर्ज दाखल केले होते.

अर्ज मागे घेण्याच्या वेळेत केवळ उपसभापती पदाच्या निवडीतून अनुराग शिंदे यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर निवडीला सुरुवात करण्यात आली. पिठासीन अधिकाऱ्यांनी हात उंचावून निवड होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी सभापती पदासाठी भाजपचे कल्याण गायकवाड यांच्या बाजुने ९ तर राकाँचे अनुराग शिंदे यांच्या बाजुने ८ मते मिळाली. 

सर्जेराव चव्हाण यांना एकाही मत मिळाले नाही. सभापतीच्या निवडीनंतर उपसभापती पदाच्या निवडीला सुरूवात झाली. यावेळी शिंदेसेनेचे बाळासाहेब गाडे यांना १० तर शिंदेसेनेचच बाबासाहेब राठोड यांना ७ मते मिळाली. सभापती, उपसभापती पदाच्या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि गुलाल उधळून जल्लोष केला. एकूण २० पैकी १७ सदस्य उपस्थित होते. तर उबाठाचे सतीष हिवाळे, दत्तात्रय वरपे आणि लताबाई कानडे हे तीन सदस्य गैरहजर होते.
पंचायत समितीला छावणीचे स्वरुप उबाठाचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी गायकवाड यांची कॉलर पकडल्यानंतर ते चांगलेच घाबरले. 

त्यांनी सभागृहात जाताच पिठासीन अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांना आपल्या जिवास धोका असल्याचे पत्र देत संरक्षणाची मागणी केली. राठोड यांनी तात्काळ हे पत्र पोलीस आयुक्तांना पाठविले. त्यानंतर पंचायत समितीच्या समोरील बंदोबस्तात मोठी वाढ केली. तीन उपायुक्त, चार पोलीस निरीक्षक, दंगा काबू पथक आणि इतर मोठा फोर्स लावण्यात आला. दानवे यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते.